Wed, Aug 21, 2019 01:53होमपेज › Nashik › पूर्वाश्रमीच्या मनसे जिल्हाअध्यक्षाला १० वर्षांनी अटक

पूर्वाश्रमीच्या मनसे जिल्हाअध्यक्षाला १० वर्षांनी अटक

Published On: Dec 19 2017 4:00PM | Last Updated: Dec 19 2017 4:00PM

बुकमार्क करा

मालेगाव : प्रतिनिधी

मनसेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड यांना मंगळवारी छावणी पोलिसांनी अटक केली. मनसेने मराठी पाट्यांसाठी २००७-०८ मध्ये राज्यस्तरीय आंदोलन केले होते. त्या प्रकरणात त्यांना आता अटक करण्यात आली आहे. 

सुनिल गायकवाड यांनी कार्यकत्यांसह ते मनसेचे जिल्हाअध्यक्ष असताना २००७-०८ ला मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला होता. हे प्रकरण न्याय प्रविष्ट होते. पण, या प्रकरणावरील सुनावणीला उपस्थित न राहिल्याने गायकवाड यांच्याविरुध्द अटक वॉरंट निघाले होते. त्यांना सकाळी अटक होऊन दुपारी मालेगाव न्यायालयात उभे केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.