Sat, Mar 23, 2019 16:14होमपेज › Nashik › सेनेच्या माजी मंत्र्याच्या पत्‍नीकडून भाजप नगरसेविकेला धमकी 

सेनेच्या माजी मंत्र्याच्या पत्‍नीकडून भाजप नगरसेविकेला धमकी 

Published On: Jul 19 2018 4:40PM | Last Updated: Jul 19 2018 4:40PMनाशिकरोड : वार्ताहर 

शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकला घोलप यांनी भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली. राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या घोलप आणि अहिरे कुटुंबाचा वाद थेट पोलीस ठाण्यात गेल्याने परिसरात हा चर्चेचा विषय होतो आहे.

याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, बुधवारी ( दि. १८ ) रोजी सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सरोज आहिरे या शिवसेनेचे माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या निवासस्थाना जवळ असणाऱ्या विहितगाव चौकात खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना अधिकारी आणि कामगारांना मार्गदर्शन करीत होत्या. त्यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकाला घोलप त्यांच्या चारचाकी वाहनांमधून प्रवास करीत होत्या.  थोडे पुढे गेल्यावर घोलप यांनी चारचाकी वाहन वळवून सरोज अहिरे यांच्या जवळ उभे केले. अहिरे यांना बोलावून हा काय तमाशा लावला आहे, अहिरे यांना उद्देशून वाईट - साईट तसेच लज्जा उत्पन्न होईल अश्या प्रकारची शिवीगाळ केली. महापालिकेचे अधिकारी , कर्मचारी तसेच सामान्य जनतेच्या समोर ही घटना घडल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. या घटनेनंतर नगरसेविका सरोज अहिरे यांनी तातडीने उपनगर पोलीस ठाणे गाठून शशिकला घोलप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान याबाबत शशिकला घोलप यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.

वयाची मानमर्यादा ठेवली - सरोज अहिरे , तक्रारदार नगरसेविका  भाजप 

शशिकला घोलप यांनी मला काहीएक कारण नसतांना अतिशय वाईट - साईट शिवीगाळ केली आहे. शिवाय जीवे ठार मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर पस्तीस वर्ष तू झोपली होती काय ? तीस वर्षापासून आमच्याकडे आमदारकी आहे. असे राजकीय भाष्य केले. सार्वजनिक ठिकाणी गलिच्छ शब्द वापरून शासकीय कामात अडसर निर्माण केला.

कोण आहेत सरोज अहिरे 

देवळाली विधानसभा मतदार संघातील माजी आमदार स्व.बाबुलाल सोमा अहिरे यांच्या सरोज अहिरे कन्या आहेत. माजी आमदार अहिरे हे दोनवेळा आमदार झाले. एकदा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असतांना त्यांना मतदारांनी निवडून दिले. सरोज अहिरे सद्या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्यांनी माजी आमदार बबन घोलप यांच्या कन्या माजी महापौर नयना घोलप यांचा महापालिका निवडणुकीत पराभव केला आहे. देवळाली मतदार संघात भाजपकडून निवडणूक लढविण्यास त्या इच्छुक आहेत

कोण आहेत शशिकला घोलप

'माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या शशिकला घोलप पत्नी आहेत. तसेच आमदार योगेश घोलप तसेच माजी महापौर नयना घोलप यांच्या मातोश्री आहेत. माजी मंत्री घोलप हे सलग पाच वेळा निवडणूक आले आहेत. तर योगेश घोलप मागील निवडणुकीत विजयी झाले आहेत. आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात बबनराव घोलप यांना शिक्षा झाल्याने ते निवडणूक लढवू शकले नाही. आमदार योगेश घोलप यांचा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून सरोज अहिरे यांच्याकडे पाहिले जात आहे. तेव्हापासून घोलप आणि अहिरे कुटुंबामध्ये राजकीय वातावरण तणाव निर्माण झाला आहे.