होमपेज › Nashik › सिन्नर-घोटी महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; २ ठार

सिन्नर-घोटी महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; २ ठार

Published On: Mar 05 2018 7:52PM | Last Updated: Mar 05 2018 7:52PMनाशिक : प्रतिनिधी

सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवट घाटाच्या पायथ्याशी चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.5) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दादाभाउ नामदेव घुले (वय, ४५) आणि मीना दादाभाउ घुले (वय, ४०, रा. चिकणी ता. संगमनेर) अशी मृतांची नावे आहेत. 

दोन्ही मृत दुचाकीने (एमएच 17, बीसी 8655) घोटीच्या दिशेने जात असताना दुचाकीपुढे आयशर (एमएच 46, एएफ8644) भरधाव वेगाने जात होता.  आयशर पुढे लोडींग ट्रक होता. दुचाकीच्या मागून दूध टॅकर (जीजे 21, डब्ल्यू 8889) येत होता. यातील ट्रक अचानक थांबल्याने आयशर ट्रकवर जाऊन आदळला. त्याचवेळी दुचाकीही आयशर आणि दूध टँकर यांच्यामध्ये सापडली. दूध टँकरही भरधाव वेगात असल्याने चालकाला वाहनावर नियंत्रण मिळविता आले नाही. आयशर आणि दुचाकीच्यामध्ये सापडून दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागेवरच ठार झाले.