Thu, Jul 09, 2020 09:40होमपेज › Nashik › नाशिकमध्ये रंगतोय फ्लड लाइट क्रिकेट, फुटबॉलचा थरार

नाशिकमध्ये रंगतोय फ्लड लाइट क्रिकेट, फुटबॉलचा थरार

Published On: Jan 01 2018 2:01AM | Last Updated: Dec 31 2017 11:10PM

बुकमार्क करा
नाशिक : रवींद्र आखाडे 

नाशिकमध्ये पाच ठिकाणी क्रिकेट आणि फुटबॉलची मैदाने कृत्रिम पद्धतीने विकसित करण्यात आली असून,  या मैदानांवर केवळ दिवसाच नव्हे तर सायंकाळनंतरही फ्लड लाइट क्रिकेट, फुटबॉल सामन्यांचा थरार अनुभवायला मिळत आहे. शहरातील तरुणाईबरोबरच नोकरवर्गाचाही या सामन्यांना प्रतिसाद मिळत आहे.

कृत्रिम हिरवळीचा वापर करून शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशी मैदाने विकसित करण्यात आली आहेत. या ठिकाणी क्रिकेट, फुटबॉलबरोबरच झुंबा नृत्य आणि योगाचेही कार्यक्रम रंगत आहेत. या मैदानांवर होणार्‍या सामन्यांना शहरातील बँका, उद्योगांबरोबरच अन्य समूहांमध्ये काम करणार्‍या तरुण पिढीकडून  या  विशेष पसंती दिली जात आहे. त्याबरोबरच अनेक ठिकाणी खेळण्याची मैदाने नसल्याने तरुणाईने या अ‍ॅस्ट्रो टर्फचा सहारा घेतल्याचे दिसत आहे. नोकरी वा कामाच्या व्यापामुळे दिवसा खेळू न शकणारे अनेकजण रात्रीच्यावेळी या सामन्यांमध्ये भाग घेऊन खेळण्याचा आनंद लुटत आहेत व या मैदानांवर हजेरी लावत आहेत.  काही तासांसाठी नाममात्र दर आकारून या सामन्यांत सहभागी होता येत असल्याने येथील सामन्यांकडे दिवसेंदिवस कल वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सामन्यांची आणि मैदानांची लोकप्रियता वाढत आहे.