Sat, Nov 17, 2018 14:53होमपेज › Nashik › नाशिक : ऑनलाइन रोलेट खेळणार्‍यांविरोधात गुन्हे 

नाशिक : ऑनलाइन रोलेट खेळणार्‍यांविरोधात गुन्हे 

Published On: Feb 14 2018 3:18PM | Last Updated: Feb 14 2018 3:18PMनाशिक : प्रतिनिधी

मोबाईलवर ऑनलाइन रोलेट बिंगो गेम खेळणार्‍या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा राजू कुमावत (23) आणि विनोदकुमार बी. मंडळ (30, दोघे रा. कुमावत चाळ, उपनगर) अशी या दोघा संशयित जुगार्‍यांची नावे आहेत. 

पोलीस नाईक सागर प्रभाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि.१३) रात्री 9.30 च्या सुमारास समृद्धी टी पॉइंटजवळील गावरान ठसा या बंद हॉटेलमध्ये  कृष्णा आणि विनोदकुमार हे दोघेही मोबाईल फन गेम नावाचा रोलेट बिंगो हा गेम ऑनलाइनरित्या खेळताना आढळून आले.