Wed, May 22, 2019 23:08होमपेज › Nashik › शौचालय बांधणाऱ्या कुटूबांच्या् हाती ‘टमरेल’ !

शौचालय बांधणाऱ्या कुटूबांच्या् हाती ‘टमरेल’ !

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी‘

स्वच्छ भारत’ अभियानातून लवकरच शौचालय बांधणीची उद्दिष्टपूर्ती होणार असली, तरी ज्यांनी शौचालय बांधले अशी जिल्ह्यातील 97 हजार 715 कुटुंबे मात्र अद्यापही प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने 137 कोटी रुपयांची मागणी नोंदविल्यानंतर प्रत्यक्षात मात्र अवघे सतरा कोटी रुपयेच प्राप्त झाले आहेत. 

प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्‍तिक शौचालय असावे म्हणून ‘स्वच्छ भारत’ अभियानाला गती देण्यात आली. या वर्षात ठरवून दिलेल्या उद्दिष्टापैकी सद्यस्थितीत बोटांवर मोजण्याइतकी कुटुंबे शौचालयाविना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कुटुंबांनाही शौचालय बांधण्यासाठी राजी करण्यात येणार आहे, असा विश्‍वासही व्यक्त करण्यात आला. जिल्हा हागणदारीमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून, लवकरच उद्दिष्टपूर्ती होण्याचे संकेत आहेत. याकामी जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी रात्रीचा दिवस केला आणि ग्रामीण भागांत जाऊन शौचालय बांधून त्याचा वापर करण्यासंबंधी जनजागृतीही केली. दुसरीकडे सरकारने मात्र यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात हात आखडता घेतल्याची बाब उजेडात आली आहे. शौचालय बांधून त्याचा वापर करणार्‍या कुटुंबांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून साडेबारा हजार दिले जात असून, केंद्र आणि राज्य सरकार मिळून हा निधी उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी हिस्सा ठरलेला आहे.

Tags : Nashik, Nashik News, few Families, waiting, stimulus, incentives


  •