Tue, Nov 20, 2018 03:52होमपेज › Nashik › येवला : एक्सप्रेस कालव्यात वडिलांसह दोन मुले गेली वाहून 

येवला : एक्सप्रेस कालव्यात वडिलांसह दोन मुले गेली वाहून 

Published On: Feb 19 2018 5:55PM | Last Updated: Feb 19 2018 5:57PMयेवला : प्रतिनिधी

येवला तालुक्यातील महालखेडा येथे नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या वेगवान प्रवाहात शेतकरी कुटुंबांतील दोन भावांसह वडील असे तीघेजण वाहून गेल्‍याची घटना घडली आहे. कांद्याला फवारणी करण्याच्या पंपामध्ये पाणी भरण्यासाठी पाटामध्ये मुलगा उतरला असताना तो पाण्यात पडून वाहून जाताना त्‍याला वाचवताना त्‍याचा भाऊ वडीलही वाहून गेले.

याविषयी अधिक माहिती अशी, महालखेडा येथील नांदूर मध्यमेश्वर एक्‍सप्रेस कालव्यात कांद्याला फवारणी करण्याच्या पंपात पाणी भरण्यासाठी एक मुलगा उतरला होता. तो पाणी भरत असताना त्‍याचा तोल जाउन तो वेगवान पाण्याच्या प्रवाहात पडला. तो वाहून जात असल्‍याने त्‍याला वाचवण्यासाठी त्‍याचा  भाऊ व वडीलही पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्‍याने भाऊ व वडीलही वाहून गेले. या घटनेची माहिती कळताच, घटनास्‍थळापासून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. यात वाहून गेलेल्‍यांमध्ये सोमनाथ शिवराम गिते, कार्तिक सोमनाथ गिते, सत्यम सोमनाथ गिते यांचा समावेश आहे. एक्सप्रेस कालव्याच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने शोधकार्यामध्ये अडचणी येत आहेत.