Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Nashik › मुंबईच्या दिशेने शेतकर्‍यांचा लाँगमार्च 

मुंबईच्या दिशेने शेतकर्‍यांचा लाँगमार्च 

Published On: Mar 08 2018 12:24AM | Last Updated: Mar 08 2018 12:14AMनाशिक : प्रतिनिधी

शेतकर्‍यांविषयी असलेले अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी मुंबई विधान भवनावर महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने लाँग मार्च काढण्यात आला आहे. मंगळवारी (दि.6) दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांनी सीबीएसपासून विधान भवनाच्या दिशेने कूच केली.  राज्यभरातील एक लाखाहून अधिक शेतकरी सोमवारी (दि.12) विधान भवनाभोवती गोळा होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

शेतकर्‍यांना कर्जमुक्‍ती मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, नदीजोड प्रकल्पाचा प्रश्‍न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, रेशनकार्डचे नूतनीकरण, इंधन किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या मागण्यांसाठी मंगळवारी (दि.6) दुपारी सीबीएस येथून किसान सभेच्या मोर्चास सुरुवात झाली.

सोमवारी (दि.12) हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत विधान भवनाला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी दुपारपासूनच सीबीएस परिसरात जिल्हाभरातील हजारो शेतकरी बांधव गोळा होत होते.नंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाले.