Mon, Apr 22, 2019 03:59होमपेज › Nashik › नाशिकमध्ये आरक्षणासाठी युवा शेतकर्‍याची आत्‍महत्‍या

नाशिकमध्ये आरक्षणासाठी युवा शेतकर्‍याची आत्‍महत्‍या

Published On: Aug 21 2018 7:23PM | Last Updated: Aug 21 2018 7:23PMसटाणा : प्रतिनिधी

शेती कर्जासाठी बँकेकडून होणारी अडवणूक असह्य झाल्याने बागलाण तालुक्यातील उत्तराणे येथील अविवाहित शेतकरी युवकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रवीण कडू पगार ( वय ३५) असे मृत युवकाचे नाव असून मंगळवारी (दि.२१) सायंकाळी ही घटना घडली आहे. मराठा आरक्षण नसल्याने नोकरी नसल्याने वैफल्य आल्याचेही मृत युवकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केले नमूद केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 

पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून शवविच्छेदनसाठी नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. प्रवीण यांनी उत्तराणे येथील जमीन विक्री करून साक्री तालुक्यातील बेहेड येथे नव्याने जमीन विकत घेतली  होती. त्यासाठी भांडवल उपलब्ध होण्यासाठी त्यांनी म्हसदी येथील सेंट्रल बँकेत कर्ज प्रकरण केलेले होते. मात्र प्रशासनाने वेळोवेळी सबबी सांगून कर्ज देण्यात टाळाटाळ केली. त्यातून आलेल्या नैराश्यातून मी आत्महत्या केली असल्याचे म्‍हटले आहे. त्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठीमध्ये कर्ज प्रकरण मंजूर न झाल्याने हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. तसेच मराठा आरक्षण नसल्याने नोकरी मिळाली नाही आणि ही वेळ आली आहे असेही नमूद केल्याचे सांगितले जाते आहे. प्रवीण अविवाहित होता, तर त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.