Sat, Aug 24, 2019 22:23होमपेज › Nashik › नाशिक : निफाडमध्ये कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

नाशिक : निफाडमध्ये कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Aug 10 2018 9:16AM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMनिफाड: वार्ताहर 

राज्यभरात एकीकडे आरक्षणाबाबत समाज संघटीत होत असताना उगाव (ता. निफाड, जि. नाशिक) येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार (वय ६३) या शेतकर्‍याने रेल्‍वेमार्गावर आत्‍महत्‍या केली. गुरुवारी शिवडीजवळील मध्य रेल्वे मार्गावर बिरार यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या एक दिड वर्षापासून ते कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त होते. 

शेतीमधून पुरेसे उत्पन्न निघत नाही, पाऊस पाणी नाही, मिळालेल्या उत्पन्नाला बाजारभाव नाही यामुळे ते आर्थिक‌ विवंचनेत होते. त्यांच्यावर सुमारे पाच लाखाचे कर्ज होते याबाबत त्यांना नोटीसाही आल्या असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे.