Thu, Apr 18, 2019 16:28होमपेज › Nashik › उभाडे येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

उभाडे येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

Published On: May 01 2018 3:05PM | Last Updated: May 01 2018 3:05PMइगतपुरी : वार्ताहर

तालुक्यातील उभाडे येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्‍महत्‍या केली आहे. लखुजी नामदेव भोर ( वय ४२ )  असे आत्‍महत्‍या केलेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे. लखुजी यांनी शेती फवारणीसाठी आणलेली कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. बागायती पिकांना हमी भाव मिळत नसल्याने लखुजी यांनी आपल्या शेतातच कीटकनाशक प्राशन केले. 

लखुजी यांनी खाजगी सावकारासह विविध बँकेच्या माध्यमातून शेतीसाठी कर्ज घेतले होते, मात्र पिकांना हमी भाव मिळत नसल्याने आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत फेडू न शकल्याने नैराश्यातून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आपल्या शेतातच शेतीचे कीटकनाशक पिऊन त्‍यांनी आत्महत्या केली.

परिसरात या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत लखुजी नामदेव भोर यांना ग्रामीण रुग्णालय घोटी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाला.