Sat, Jul 20, 2019 21:39होमपेज › Nashik › नाशिक : शेतकऱ्यांनी दूध ओतून केला सरकारचा निषेध

‘शेतकऱ्यांनी दूध ओतून केला सरकारचा निषेध’

Published On: Jun 01 2018 11:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:03AMयेवला (जि.नाशिक) : प्रतिनिधी

संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. यासंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्ष उलटल्यानंतरही पूर्तता न झाल्याने राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन, आणि किसान एकता मंचाने  आजपासून संप पुकारला आहे. यात येवला तालुक्यातील धुळगाव व  पाटोदा येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दुध ओतून सरकारचा निषेध केला.

वाचा : शेतकरी संप Live update :  देशातील २२ राज्यात आंदोलन सुरु

मागील वर्षी झालेल्या संपानंतर शासनाने कर्जमाफी केली. मात्र,  कर्जमाफीसाठी वेगवेगळे निकष व तत्वतः या प्रकारामुळे दिड लाखापर्यंतच कर्जमाफी मिळाली. काहीना जाचक निकषात न बसता आल्याने कर्जमाफीला मुकावे लागले. पेरणीसाठी उचल देण्याची घोषणाही घोषणाच राहीली असून प्रत्यक्षात काहीच पदरात पडले नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. आजपासून सुरु झालेल्या संपामध्ये येवला तालुक्यातील धुळगाव व पाटोदा येथील शेतकऱ्यांनी येवला – पाटोदा रस्त्यावर दुध ओतून घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला.

भाजप सरकारने मागील वर्षी दिड लाखापर्यंत कर्ज माफी केली असून तत्वतः निकष अटीमुळे अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. पेरणीसाठी दहा हजार रुपये उचल देण्याची घोषणा केली असून अद्याप कोणलाही मिळालेले नाही. त्यामुळे आजपासून याठिकाणी शेतकरी संपावर जात आहे.
-  एकनाथ गायकवाड, शेतकरी, धुळगाव 

आजपासून ते १० जूनपर्यंत होत असलेल्या शेतकरी संपास आम्ही धुळगावच्या सर्व युवक शेतकऱ्यांनी जाहिर पाठींबा याठिकाणी दिला आहे.  आम्हीही या संपात सहभागी झालो असून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.
- योगेश सोमवंशी , शेतकरी