Mon, May 20, 2019 10:05होमपेज › Nashik › मनपा प्रशासनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक

मनपा प्रशासनाच्या विरोधात शेतकरी आक्रमक

Published On: Apr 15 2018 11:12AM | Last Updated: Apr 15 2018 11:12AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात आडगाव येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेती मालमत्‍ता कराचे दर वाढल्‍याने शेतकरी संतप्त झाले असून, संतप्त  शेतकरी  आणि सर्वपक्षीय नेत्‍यांनी प्रशासनाच्या विरोधात बैठक आयोजित केली आहे. 

या बैठकीत शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. मनपा प्रशासन विरोधात आंदोलन करण्याची तयारी सुरु असून, प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा कर शेतकऱ्यांवर लादु नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  ग्रीन झोन बरोबरच यलो झोनवर कोणताही कर वसूल करू नये असे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे. 

या बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, बाबुराव ठाकरे, दत्ता गायकवाड, राजू देसले, नगरसेविका शीतल मालोदे, सुरेश खेताडे यांच्यासह आडगाव मधील सर्व शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते हजर होते.