Sun, Jan 20, 2019 16:31होमपेज › Nashik › पंचवटीमध्ये पतंग काढताना शॉक लागून बालकाचा मृत्यू

पंचवटीमध्ये पतंग काढताना शॉक लागून बालकाचा मृत्यू

Published On: Dec 09 2017 6:43PM | Last Updated: Dec 09 2017 6:42PM

बुकमार्क करा

पंचवटी : प्रतिनिधी

घराजवळ असलेल्या विजेच्या तारेवर अडकलेला पतंग लोखंडी गजाने काढताना शॉक लागल्याने पेठरोडवरील फुलेनगरला राहणारा (कातारी गल्ली) गुरू किशोर भोंड (वय १०) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि.९ रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याबाबत पंचवटी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

फुलेनगर (कातारी गल्लीत) राहणारा गुरू भोंड हा दहा वर्षीय बालक शनिवारी दुपारी घराजवळ पतंग उडवत होता. यावेळी त्‍याचा पतंग विजेच्या तारेवर अडकला. अडकलेला पतंग लोखंडी गजाने काढताना त्‍याला विजेचा धक्‍का बसला. यामध्ये तो ठार झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्‍टरांनी त्‍याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.