Mon, Nov 19, 2018 04:46होमपेज › Nashik › नंदुरबार : बनावट खताचा साठा जप्त; तिघांवर गुन्हा

नंदुरबार : बनावट खताचा साठा जप्त; तिघांवर गुन्हा

Published On: Jul 07 2018 11:20AM | Last Updated: Jul 07 2018 11:20AMनंदूरबार : प्रतिनिधी

शहादा येथे एका दुकानावर टाकलेल्या छाप्यात बनावट खताचा साठा जप्त करण्यात आला. छाप्यात जप्त करण्यात आलेल्या खतांची किंमत सव्वा लाख रुपये इतकी असून या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  काल शुक्रवारी रात्री ऊशिरापर्यंत शहादा शहरात दुकानांवर छापा टाकण्यात आला. यात प्रकाश रोडवरील सुभाष आँटोमोबाईल या दुकानात किसान पोटँश, किसान एनपीके, किसान डीटीपी या कंपनीचे खत विनापरवाना विक्री करण्यासाठी साठवलेले आढळून आले. या खताची किंमत १ लाख २६ हजार ४०० इतकी आहे. याप्रकरणी भुषण सुभाष छाजेड, किशोर ब्रिजलाल पाटील, रा.मलोणी आणि सुरत येथील किसान आँर्गनिकचा प्रोप्रायटर जिग्नेश ठक्कर या तिघांविरूध्द शहादा पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री १० वाजता गुन्हा नोंद झाला.