Wed, Apr 24, 2019 12:20होमपेज › Nashik › जळगाव: अतिसार सदृश्य लागण, दोघांचा मृत्यू 

जळगाव: अतिसार सदृश्य लागण, दोघांचा मृत्यू 

Published On: Sep 09 2018 11:33PM | Last Updated: Sep 09 2018 11:33PMयावल (जळगाव): प्रतिनिधी

तालुक्‍यातील किनगाव येथे अतिसार सदृश्य लागण ग्रस्त दोन जण दगावल्याने खळबळ उडाली आहे. तर रात्री नऊ वाजेच्या सुमारास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुमारे ४० जणांना अतिसार सदृश्य लागण झाल्याने उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून काहींवर येथे उपचार तर काहींना जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

किनगाव येथे आज रविवारी सकाळपासूनच अतिसार सदृश्य लागण झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही जणांना उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. त्यात नाना माधव साळुंखे (वय 38) यांना पहाटे पूर्वी आरोग्य केंद्रात आणले होते तर तेथून जळगाव येथे हलविण्यात आले त्यानंतर सायंकाळी दिलीप गेंदा साळुंके (वय 50) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्यांनाही जळगाव देण्यात आले. दरम्यान उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. रात्री नऊ वाजता आरोग्य केंद्रात किनगाव गावातून बारा जणांना चार दाखल करण्यात आले असून गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. किनगाव खुर्दचे सरपंच भुषण पाटील, सुरेश सोनवणेसह मोठ्या प्रमाणावर काहीजण आरोग्य केंद्रात आहेत. लागण झालेल्यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. त्यातील काही जणांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारसाठी हलवण्यात आले आहे.