Wed, Mar 27, 2019 02:00होमपेज › Nashik › शस्त्रसाठ्याचा तपास योग्य दिशेने : चौबे

शस्त्रसाठ्याचा तपास योग्य दिशेने : चौबे

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 21 2017 11:31PM

बुकमार्क करा

धुळे : प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील टोल नाक्यावर सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू असून, उत्तर प्रदेशातून चोरीस गेलेल्या आणि चांदवडजवळ हस्तगत झालेल्या शस्त्रसाठ्यात बरेचसे साम्य असल्याची माहिती नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दिली. धुळ्यात दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर चौबे यांनी पत्रकारांशी संवाद सधला.

शनिवारी (16) मुंबई-आग्रा महामार्गावरून मुंबई शहराच्या दिशने जाणार्‍या एका गाडीमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.या घटनेचा दहशतवादी कृत्याबरोबर संबंध आहे का, याबाबतही तपास सुरू असल्याचे चौबे यांनी सांगितले. या घटनेचा तपास समाधानकारक असल्याने लवकरच याबाबत माहिती समोर आणली जाणार आहे. शस्त्रसाठा घेऊन गेलेले वाहन धुळे शहरामधून गेले असले तरीही या प्रकरणात जिल्ह्यातील अधिकार्‍यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नसल्याचे सांगितले.