Fri, Jan 18, 2019 12:58होमपेज › Nashik › साक्रीजवळ विमान कोसळले; दोन जखमी

साक्रीजवळ विमान कोसळले; दोन जखमी

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 02 2017 12:30AM

बुकमार्क करा

धुळे :

साक्री तालुक्यातील दातर्ती गावाजवळ विजेच्या तारांना द बॉम्बे फ्लाईग क्लबचे विमान धडकल्याने झालेल्या अपघातात पायलटसह सहा प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री 9.00 च्या सुमारास ही घटना घडली. 

दातर्ती शिवारात विमानाचा मोठा आवाज होऊन ते थेट गावालगत कोसळले. घटना घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत विमानातून पायलटसह सहा जणांना बाहेर काढले. त्यानंतर ही माहिती पोलिस दलाला देण्यात आली. काही वेळात घटनास्थळी दाखल झालेल्या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी जखमींना साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे.