Mon, Apr 22, 2019 01:45होमपेज › Nashik › धुळे, जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद

धुळे, जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद

Published On: Jan 04 2018 1:03AM | Last Updated: Jan 04 2018 12:02AM

बुकमार्क करा
धुळे : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव घटनेचा निषेधार्थ विविध संस्थे, संघटना तसेच राजकीय पक्षांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदाला जळगाव जिल्ह्यात सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळाला.  विशेषता धुळे शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो नागरीकांनी सहभागी होत कोरेगाव घटनेचा निषेध केला. या दरम्यान दोन ठिकाणी किरकोळ दगडफेक तर ग्रामीण भागात विविध ठिकाणी बसेसवर झालेल्या दगडफेकीत 11 बसचे नुकसान झाले. तर दोन दिवसात जिल्ह्यात एकुण 21 बसेस फोडण्यात आल्या आहेत. 

दोन दिवसांपासून भीमा-कोरेगाव घटनेचे तिव्र पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. बुधवारी (दि.2) विविध संघटनांनी बंदचे अवाहन केल्याने सकाळपासूनच सर्वत्र वर्दळ कमी झाली होती. नेहमी गर्दी असलेला आग्रा रोडवरील बाजारपेठ, सराफी व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती. तर शहरातील गल्ली बोळातील दुकानेही बंद होते. दुपारी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर मोर्चास सुरूवात झाली. या मोर्चात साक्री रोडवरील भीमनगरातुन महिलाल कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मोर्चा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोरून तहसिल कार्यालयपर्यंत नेला. यानंतर हा मोर्चा नगरपालिकेकडे न वळता थेट बारापत्थर चौक मार्गे आग्रारोड वरून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेण्यात आला.

हा प्रकार वगळता मोर्चा शांततेत पार पडला. ग्रामीण भागात झालेल्या दगडफेकीत गौरव लक्ष्मण वाघ, हेमंत दिनेश आलोने, डॉ निखिल पंतवैदय, शांताराम पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. यावेळी दोन शिष्ठमंडळांनी स्वतंत्रपणे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवदन दिले. नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, प्रकाश शिरसाठ, संजय शिरसाठ, आनंदा बागुल, वंदना बागुल यांच्यसह अन्य कार्यकत्यांनी भूमिका मांडली. राज्यात भाजपा सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमधे वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी मिलींद एकबोटे आणि संभाजी भीडेगुरूजी यांच्यावर गुन्हे दाखल करून देखिल त्यांना अटक केली नसल्याने त्यांना अटक करण्याची मागणी केली.