Wed, Aug 21, 2019 19:53होमपेज › Nashik › धुळे : राईनपाडा मारहाण प्रकरण; मुख्य मारेकर्‍याला अटक

राईनपाडा हत्याकांड; प्रमुख संशयितास अटक

Published On: Jul 10 2018 6:33PM | Last Updated: Jul 10 2018 9:05PMधुळे : प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात मुले पळविणा-या टोळीचा संशय घेऊन पाच जणांना ठार करणा-या आणखी एका मुख्य मारेक-यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक सुनिल भाबड यांच्या पथकाने अटक केली. या आरोपीने पाचही जखमी लोक निपचीत पडल्यानंतर त्यांची नाडी तपासून ते मयत असल्याची खात्री केल्याचे व्हिडीओ क्लीपमधे दिसत आहे. विशेषता या आरोपीने तपासणी केल्यानंतर पुन्हा लोखंडी रॉडने जखमींवर जिवघेणे वार केल्‍याचे दिसून आले आहे.

राईनपाडा गावात गेल्या रविवारी मंगळवेढा परिसरातील रहीवासी असणारे पाच लोक भीक्षा मागणाण्यासाठी गेले असता, त्‍यांना मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून मारहाण करण्यात आली होती. विशेषता या मारहाणीची क्लीप अनेक जणांनी मोबाईलमध्ये चित्रित केली होती. या सर्व क्लीप गोळा करून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यासाठी नाशिक येथील सायबर सेलच्या मदतीने या क्लीपचा स्पीड कमी करून मारेक-यांचे फोटो तयार करण्यात आले. यानंतर पुन्हा अटक सत्र सुरू करण्यात आले आहे. हत्याकांडानंतर राईनपाडा आणि अन्य गावातील तरूणांनी पलायन केले असुन वृध्द आणि महिलांनी पोलिस तपासाला असहकार्य करणे सुरू ठेवल्याने आरोपी शोधणे पाचही पोलिस पथकाला मोठे अग्नीदिव्य ठरत आहे.  दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक निरीक्षक सुनिल भाबड यांच्या पथकाने या भागातील गुप्त माहितीदारांच्या मदतीने मध्यरात्री महत्वाच्या आरोपीचा शोध लावत त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला. चौपाडा गावातून एका शेतामधून गुलाब रामा पाडवी (वय 55) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पाडवी याने हल्ला करतांना पांढरी टोपी परिधान केल्याचे क्लीपमधे दिसत आहे. पाडवी याने जमावाने मारहाण केल्यानंतर बेशुध्द असणा-या पाचही जणांची नाडी तपासुन ते मयत आहे कींवा नाही, याची खात्री केली होती. तपासणी नंतर त्याने पुन्हा रॉडने या पाचही जणांवर हल्ला केला. यानंतर अन्य तरूणांनी पुन्हा पाचही निपचित पडलेल्या भिक्षुकांवर पुन्हा हल्ला चढवत त्यांना ठार केल्याचे व्हिडिओ क्लीपमधे दिसत आहे. यापुर्वी याच पथकाने वारसा गावाच्या जंगलामधुन दशरथ पिंपळसे याला अटक केली आहे. या आरोपीने देखिल जीवघेणे वार केल्याचे दिसत आहे.  पोलिस पथकाने आता व्हिडिओ क्लीपच्या आधारावर कारवाई करणे सुरू केल्याने ख-या हल्लेखोरांना गजाआड करण्यास सुरूवात झाली आहे.