Thu, Sep 20, 2018 19:59होमपेज › Nashik › ढगाळ वातावरणाने देवळ्यात शेतीकामे ठप्प

ढगाळ वातावरणाने देवळ्यात शेतीकामे ठप्प

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 05 2017 11:42PM

बुकमार्क करा

देवळा : वार्ताहर

तालुक्यात ओखी वादळाचा  प्रभाव होता. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला,. दिवसभर ढगाळ वातावरण आणि धुक्यासारखे वातावरण होते. वातावरणात गारठा असल्याने शेतीतील कामे ठप्प झाली होती. शाळा- विद्यालयांमधील उपस्थितीवर बदलेल्या वातावरणाचा परिणाम झाला होता.

अवकाळी पावसाने शेतातील मका व कांद्यांचे नुकसान झाले.  नुकताच लागवड केलेल्या कांद्यावर करपा व मावा-तुडतुडे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.  वीटभट्ट्यावरील नुकत्याच तयार केलेल्या विटांचे नुकसान झाल्याचे चित्र होते. बाजार समितीच्या आवारात कांदा, मका झाकण्यासाठी शेतकरी- व्यापारी वर्गाची धावपळ सुरू होती. बाजार समितीत विक्रीला आलेल्या कांद्याला अवकाळी पावसाने भिजण्याचा फटका बसू नये म्हणून शेतकर्‍यांनी समितीत वाहनातील कांदा झाकण्यासाठी धावपळ केली.
लाल कांद्याच्या भावात सुधारणा

लाल कांद्याच्या दरात मंगळवारी सुधारणा झाली. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. या कांद्याची 2 हजार  क्विंटल आवक झाली.  प्रतिक्विंटल 2 हजार 500 रु, तर कमाल 3 हजार 800 रुपये आणि  सरासरी 3 हजार 600 रुपये दर कांद्याला मिळाला.