मालेगाव :
संविधान जाळणार्या जातीयवादी समाजकंटकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान काही जातीयवादी समाजकंटकांनी जाळली. ती जाळणार्या समाजकंटकांवर तसेच, नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्या वाहनावर भ्याड हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणार्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, आदिवासी व मागासवर्गीय दलीत महिला, मुलींवर होणारे अत्याचार थांबवावेत, राज्यात बोगस आदिवासी यांना नोकरीवरून कमी करून त्यांच्या जागी मूळ निवासी खरा आदिवासी यांना नोकरीवर घेण्यात यावे, अशी मागणी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र माळी, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास पवार, महिला जिल्हाध्यक्ष मंगला तलवारे, दादाजी नवरे, रमेश माळी, राकेश माळी, धोंडू पवार, बापू गोरे, संजय सोनवणे, झुंबरलाल सोनवणे यांच्यासह पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.