Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Nashik › शेततळ्यात बुडून दोघा तरुणांचा मृत्यू

शेततळ्यात बुडून दोघा तरुणांचा मृत्यू

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:48PMलासलगाव : वार्ताहर

पोहण्यास गेलेल्या दोन युवकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.9) लासलगावजवळील निमगाव वाकडा येथे येथे घडली.लासलगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुजमिल फारुख शेख (17) आणि भरत वसंत शिंदे (18) निमगाव वाकडाजवळील राजवाडा येथील सोमनाथ शेजवळ यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. शेततळ्याला कंपाउंड असून, दोन गेट आहेत. शेजवळ कुटुंब लग्नानिमित्त बाहेरगावी असल्याने हे दोघे तळ्यात उतरले. 

मुजमिल शेखला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागल्याने भरत शिंदे याने मुजमिलला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, मुजमिलने भरतला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. दोघांनाही पोहता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. शेजवळ कुटुंब लग्न आटोपून घरी आले असता त्यांना तळ्याचे गेट उघडे दिसल्याने हा प्रकार उघड झाला. दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.