Fri, Jul 19, 2019 14:06होमपेज › Nashik › शेणीत येथे आढळला मृत बिबट्या!

शेणीत येथे आढळला मृत बिबट्या!

Published On: Mar 11 2018 1:23AM | Last Updated: Mar 10 2018 11:40PMमुकणे : वार्ताहर

शेणीत येथे शनिवारी पाच ते सहा महिन्याच्या मृत बिबट्याचे अवशेष एकाने काढून घेतल्याची घटना उघडकीस आली असून, इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या अधिकार्‍यांनी तपास करून संशयिताला काही तासांतच अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची वनकोठडी दिल्याची माहिती इगतपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे यांनी दिली.

शेणीत येथे ऊसतोडीचे काम सुरू असून, शेतकरी संदीप मोरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 404 मध्ये पाच ते सहा महिन्याचा मादी जातीचा बिबट्या मृत आढळला. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. पी. ढोमसे, वनपरिमंडळ अधिकारी जी. आर. जाधव, वनरक्षक एफ. जे. सय्यद, एस. के. बोडके, बी. व्ही. दिघे, श्रीमती आर. टी. पाठक यांंनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता मृत बिबट्याचे काही अवशेष नसल्याचे निदर्शनास आले. वनाधिकार्‍यांनी अधिक तपास करून संशयित आरोपी कारभारी बाबूराव पवार (रा. कोल्ही, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) यास ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात वन्यप्राण्यांसह बिबट्यांचा वावर वाढला असून, नागरिकांत दहशत पसरली आहे.