Thu, Nov 15, 2018 20:12होमपेज › Nashik › सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 11:09PMनाशिक :

प्रजासत्ताक दिनाला लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांना तीन दिवस सुट्टी मिळाली आहे. या सुट्टीनिमित्त नाशिकमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. परिणामी शहराच्या अर्थचक्राला गती मिळाली आहे. 

प्रजासत्ताक दिन, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये राज्य आणि देशातील विविध कानाकोपर्‍यांतून भाविक व पर्यटक नाशिकला दाखल झाले आहेत. तर नाशिकचे पर्यटकदेखील विविध ठिकाणच्या टुरवर गेले आहेत. 

देवदर्शनासह पर्यटन असा दुहेरी हेतू साध्य करणार्‍या नागरिकांनी एसटी महामंडळाच्या बसेसलादेखील प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आवडेल तेथे प्रवास योजनेला नाशिकसह राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक शहरात धार्मिक तीर्थस्थळांबरोबरच पर्यटन स्थळांवरदेखील मोठी गर्दी होत आहे. खासगी वाहतूकदारांनी पुणे, सुरत, शिर्डीसह इतर ठिकाणच्या प्रवासभाड्यात काहीशी वाढ केली आहे. रेल्वे बुकिंगदेखील फुल्ल झाले आहेत.