Wed, Nov 14, 2018 16:46



होमपेज › Nashik › झोका खेळताना फास लागून बालकाचा मृत्यू

झोका खेळताना फास लागून बालकाचा मृत्यू

Published On: Mar 06 2018 4:13PM | Last Updated: Mar 06 2018 4:13PM



त्र्यंबकेश्वर : वार्ताहर

तालुक्यातील सारस्ते येथे बारा वर्षीय मुलाचा झोका खेळत असताना फास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घरात लहान बाळासाठी नायलॉन दोराने बांधलेला झोका खेळत असताना रविवारी दुपारी त्याला फास लागला. यामध्ये उमेश मनोहर कुवर (वय१२, रा. सारस्ते ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) याचा मृत्‍यू झाला आहे. या घटनेनंतर उमेशला त्याचा चुलत भाऊ दीपक रमेश कुवर याने रुग्णालयात दाखल केले, मात्र त्‍याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. 

याप्रकरणी हरसूल पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे.