Thu, Mar 21, 2019 16:11होमपेज › Nashik › धावत्या मारुती ओमनी व्हॅनने अचानक घेतला पेट(व्हिडिओ) 

धावत्या मारुती ओमनी व्हॅनने अचानक घेतला पेट(व्हिडिओ)

Published On: Apr 06 2018 11:43PM | Last Updated: Apr 06 2018 11:43PMमनमाड(जि. नाशिक): प्रतिनिधी 

धावत्या मारुती ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना आज(दि. ६ एप्रिल) शुक्रवारी रात्री 9 च्या दरम्यान मनमाड-नांदगाव रोडवर हिसवळ जवळ घडली. गाडी गैस सिलेंडरवर चालणारी असल्याने आग लागल्या नंतर सिलेंडरचा स्फोट होऊन गाडी जळून खाक झाली. गाडीत चार जण होते मात्र, आग लागताच सर्व जण गाडीच्या बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले. गाडीला आग लागल्या नंतर या मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूला थांबविण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच मनमाड येथून अग्निशमन दल घटना स्थळी रवाना होऊन त्यांनी एक तासाच्या प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आणली मात्र, तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळाली होती. गाडी मनमाडची असल्याचे समजते.