Fri, Apr 26, 2019 04:04होमपेज › Nashik › सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी २५ कोटी : मुख्यमंत्री

सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी २५ कोटी : मुख्यमंत्री

Published On: Jul 02 2018 7:25PM | Last Updated: Jul 02 2018 7:25PMकळवण (जि. नाशिक) : प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री सप्तशृंगी गडाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात येत आहे. भविष्यातही यासाठी अधिक  निधी उपलब्ध करून देऊ आणि नाशिक जिल्ह्यात धार्मिक पर्यटन हब निर्माण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी  ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

सप्तशृंगी गड येथे देशातील पहिला प्युनिक्युलर रोपवे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी पालक मंत्री गिरीश महाजन  होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ,  ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,  खासदार हरिशचंद्र चव्हाण, आमदार जे. पी. गावित, आमदार  डॉ  राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हापरिषद अध्यक्षा शितल सांगळे, आमदार नरहरी जिरवळ, आमदार दिपीका चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार पंकज भूजबळ,  महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, सुनिल बागुल,  सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच राजेश गवळी, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, महामंत्री नंदकुमार खैरनार, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके आदी उपस्थित होते. 

पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की,  ‘‘सप्तशृंगी गड येथे देशातील पहिला प्युनिक्युलर रोपवे इमारत सर्व सोयी सुविधांयुक्त दर्जेदार  बनले आहे. गुरुबक्षणी  त्यांचे सहकारी  सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगली वस्तू उभारून  या भागाच्या धार्मिक आणि पर्यटन विकासाला चालना देऊन  रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. नाशिक जिल्हा  तसा विविध गुणसंपन्न आणि धार्मिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. आजचा दिवस भाविकांसाठी ऐतिहासिक दिवस असून, दिव्यांगांसह जेष्ठ नागरिकांसाठी  ट्रॉली उपयुक्त ठरणार  असल्याचे गौरवूद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. 
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, ‘‘मी स्वित्झर्लंड  येथे गेलो असता तेथील फ्युनिक्युलर  रोपवे बाघितले. आपले राज्य नाशिक जिल्ह्यातही  प्रकल्प सप्तशृंग गडावर करता येईल अशा आशेने नऊ वर्षांपूर्वी त्याही मुहूर्तमेढ रोवली असता आज त्या प्रकल्पाचे उद्घाटन लोकार्पण सोहळा पार पडत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. यावेळी भुजबळांनी नाशिक शहरातील गोदा बोट प्रकल्प व मांजरपाड्याचे राहिलेले काम पूर्ण करून त्याचे पुण्यकर्म पालक मंत्री गिरीश महाजन यांनी घ्यावे असे आवाहन भुजबळ यांनी केले. 

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले, ‘‘सप्तशृंग गडाला बी वर्ग दर्जा मिळाला असून, गडावरील विविध विकास कामांच्या २५ कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्यास तात्काळ मंजुरी द्यावी व पंढरपूर धर्तीवर खानदेशातून पायी चालत येणाऱ्या भाविकांसाठी निर्मल वारीसाठी निधी द्यावा व सप्तशृंगी गड येथील वनजमिनी बाबत मुंबई येथे स्वतंत्र बैठक घेण्यात यावी. 
पालकमंत्री  गिरीश महाजन म्हणाले, ‘‘फ्युनिक्युलर रोपवे उद्घाटन सोहळ्यास उशीर झाला असला तरी भावीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या  विविध खात्याच्या सर्वच परवानग्या मिळाल्या नंतर आज प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे. भुजबळ साहेबाच्या मागणी नुसार  मांजर पाडा प्रकल्पाचे काम येत्या सहा महिन्यात मार्गी लागणार आहे. पुढील पावसाळ्यात प्रकल्पातील पाणी अडवून मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच प्रकल्पाचे उदघाटन करू. अशी ग्वाही महाजन यांनी दिली.