Thu, May 23, 2019 20:52
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › बसखाली चिरडून पादचारी ठार

बसखाली चिरडून पादचारी ठार

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 11:40PMम्हसरूळ : वार्ताहर

दुभाजक ओलांडताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली सापडून पादचारी जागीच ठार झाला. दिंडोरी रोडवरील स्टेट बँकेसमोर सोमवारी (दि.12) सायंकाळी चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. राजेंद्र विठ्ठल सूर्यवंशी (50) असे या मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. सूर्यवंशी हे बँकेसमोरून पलीकडील पोकार कॉलनीच्या दिशेने दुभाजकावरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी त्यांचा पाय घसरल्याने ते रस्त्यावर कोसळले. नेमकी याचवेळी कळवण-नाशिक या बस (एमएच 40 एन 8802) खाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, बसही जमा करण्यात आली आहे. सूर्यवंशी हे मूळचे गोळशी (ता. दिंडोरी) येथील आहे. सुमारे 20 वर्षांपासून ते मेरी परिसरात वास्तव्यास होते. सध्या ते चामरलेणी परिसरातील एकतानगर येथे सहकुटुंब राहात आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी तसेच दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सूर्यवंशी यांनी दीर्घकाळ पेंटर म्हणून व्यवसाय केला आहे.