Sun, Jun 16, 2019 02:12होमपेज › Nashik › एका ब्रेकमुळे वाचले ३८ प्रवाशांचे प्राण 

एका ब्रेकमुळे वाचले ३८ प्रवाशांचे प्राण 

Published On: Dec 05 2017 12:16PM | Last Updated: Dec 05 2017 12:16PM

बुकमार्क करा

नंदुरबार : प्रतिनिधी

‘देव तारी त्‍याला कोण मारी’ अशी म्‍हण आहे. मात्र, नाशिकमध्ये ३८ प्रवशांना या म्‍हणीचा प्रत्‍येय आला आहे. समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकची धडक चुकवण्यासाठी रस्त्याच्या कडेला ऊतरवलेली बस पुलाखाली कोसळण्यापासून चालकाने वाचविली आहे. बसचालकाने मोठ्या धिराने आणि कौशल्याने ब्रेक मारून बस तगवून ठेवली आणि ३८ प्रवाशांचे प्राण वाचवले.

बसमधील सर्व प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर येईपर्यंत चालक ब्ररेकवर पाय ठेवून बसला होता. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर तळोदा (जि.नंदुरबार) येथे आज सकाळी ७.३० वाजता ही घटना घडली. अपघातातून वाचलेली बस गुजरात डेपोची आहे.