Tue, Oct 24, 2017 16:54
29°C
  Breaking News  

होमपेज › Nashik › नाशिकमध्ये भावाकडूनच बहिणीचा खून

नाशिकमध्ये भावाकडूनच बहिणीचा खून

Published On: Jul 17 2017 4:35PM | Last Updated: Jul 17 2017 4:35PM

बुकमार्क करा


नांदगाव : वार्ताहर

नाशिक जिल्‍ह्यात सख्ख्या भावानेच बहिणीचा खून केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा शिवारात भाऊ राजू दादा मुकणे याने बहीण आरती (वय १७) हिच्या पाठीत दगड घालून हत्या केली. त्यानंतर राजू हा फरार झाला. 

साकोरा येथील सोन्याबाई मुकणे यांची मुलगी आरती हिने दीड वर्षांपूर्वी पळून जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. लग्‍नानंतर काही महिन्यांनी नवर्‍याबरोबर पटत नसल्याने ती मोठा भाऊ पिंटू मुकणे याच्याकडे रणखेडा येथे राहण्यास  आली.

काही दिवसानंतर तिला लहान भाऊ राजू मुकणे याच्याकडे पाठवले. याठिकाणी आरतीची मोठी बहीण बायटाबाईही राहत होती. बायटाबाई हिने आरतीला तिच्या नवर्‍याशीच लग्‍न करून सवत बणून राहण्याचे सुचवले. मात्र, त्यामुळे बायटाबाईचा संसार मोडेल असे भाऊ राजूचे मत होते. त्याने दोघी बहिणींना समजावण्याचा प्रयत्‍न केला. परंतु दोघीही ऐकण्यास तयार नव्‍हत्या त्यामुळे राजू याने आरतीच्या पाठीत दगड घातला. तसेच पोटावर लाथा बुक्‍क्यांचे प्रहार केले. त्यामुळे आरतीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर राजू तेथून फरार झाला.

याबाबत मृत आरती हिच्या आई सोन्याबाई यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस आरोपी राजू मुकणे याचा शोध घेत आहेत.