Fri, Sep 21, 2018 01:52होमपेज › Nashik › भुसावळमध्ये भावानेच केला भावाचा खून

भुसावळमध्ये भावानेच केला भावाचा खून

Published On: Feb 08 2018 11:39AM | Last Updated: Feb 08 2018 11:51AMजळगाव : प्रतिनिधी

भुसावळ शहरातील मोहम्मदी नगरात घरगुती वादातून लहान भावाने थोरल्या भावाचा चाकूने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या  सुमारास उघडकीस आली. आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील मोहम्मदी नगरातील रहिवासी असलेला जावेदअली गुलामअली (वय 29) हा गवंडी काम करत होता. त्याचा लहान भाऊ आणि व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या वाहेदअली गुलामअली (वय 27) याने त्याची चाकूने वार करून हत्या केली. गंभीर जखमी अवस्थेतील जावेदअली याला कोणार्क रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.