होमपेज › Nashik › विहिरीत शिक्षकाचा हातपाय बांधलेला मृतदेह आढळला

विहिरीत शिक्षकाचा हातपाय बांधलेला मृतदेह आढळला

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 27 2018 11:27PMवावी : वार्ताहर

मर्‍हळ शिवारातील विहिरीमध्ये कोपरगावच्या शिक्षकाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि. 27) सकाळी दहा वाजेच्या सुमारास  आढळून आला. अरुण सुकदेव कर्डेल (40) असे शिक्षकाचे नाव आहे.

पांगरी-मर्‍हळ रस्त्यावर सोमनाथ देवीदास शहाणे यांचे शेत आहे. मंगळवारी मेंढीपाळ मेंढ्या चारण्यासाठी घेऊन आले होते. शहाणे यांच्या विहिरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे मेंढीपाळाने पाहिल्यानंतर वावी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून  मृतदेह शवविच्छेनासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कर्डेल हे तालुक्यातील मानोरी येथील रहिवासी असून, ते कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील जंगलीदास महाराज शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कामाला होते.

गेल्या बुधवारी (दि.21) कर्डेल वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी  सिन्‍नरला  दुचाकीने (एमएच 15,  इयू 5825) आले होते. मात्र, तेव्हापासून ते बेपत्ता होते. विहिरीजवळ अडोशाला दुचाकी, चप्पल आणि मद्याच्या भरलेल्या आणि रिकाम्या बाटल्या मिळून आल्या आहेत. याप्रकरणी वावी पोलीस नोंद करण्यात आली आहे.