Wed, Jan 22, 2020 12:52होमपेज › Nashik › गिरीश महाजन ढोल वाजवतच म्हणाले, 'त्यांचाही' लवकरच फुटणार!

गिरीश महाजन ढोल वाजवतच म्हणाले, 'त्यांचाही' लवकरच फुटणार!

Published On: Sep 12 2019 2:21PM | Last Updated: Sep 12 2019 2:21PM

नाशिक : विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरिश महाजन यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला.नाशिक : प्रतिनिधी

गणराया नेहमी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. गणराया आमच्यावर प्रसन्न आहे. लोकसभेप्रमाणानेच आगामी विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडून स्पष्ट बहुमत मिळेल. या निवडणुकीत विरोधी पक्षांचा ढोल फुटणार असल्याचे भाकीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले.

शहरातील वाकडी बारव येथे मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. राज्यात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत आहे. काही भागात पावसाने सरासरी पार केली आहे. केवळ दोन ते तीन जिल्ह्यांत कमी पाऊस झाला आहे. समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे अतिशय आनंदाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे, असे महाजन यांनी सांगितले.

विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरिश महाजन यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला. त्यांच्या जोशपूर्ण आणि लयबध्द स्टेपने ढोल पथकांचा उत्साह वाढविला. ढोल वाजवत महाजन यांनी मिरवणुकीचा मनसोक्त आनंद लुटला. काही कार्यकर्त्यांसह नृत्य करण्याचा मोह महाजन यांना आवरला नाही.