Fri, Sep 20, 2019 04:44होमपेज › Nashik › भीमा कोरेगावप्रकरणी नाशिक बंद, रास्‍ता रोको

भीमा कोरेगावप्रकरणी नाशिक बंद, रास्‍ता रोको

Published On: Jan 02 2018 2:53PM | Last Updated: Jan 02 2018 2:53PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

धुळे-भीमा कोरेगाव प्रकरणी धुळ्यात तीव्र पडसाद उमटले आहे. धुळ्यात रात्री उशीरा चार बसवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज सकाळी विश्रामगृहाच्या प्रांगणात संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी दंगलीचा निषेध करण्यात आला.

यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून आंदोलनाला सुरुवात झाली. यानंतर साकी रोडवर दोन बसवर दगडफेक झाली. साकरी रोडवर रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली असून शहरातील बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex