Tue, May 21, 2019 22:33होमपेज › Nashik › भारत बंद : नाशिकमध्ये बस सेवा बंद, व्‍यवहार ठप्‍प

भारत बंद : नाशिकमध्ये बस सेवा बंद, व्‍यवहार ठप्‍प

Published On: Sep 10 2018 10:25AM | Last Updated: Sep 10 2018 10:25AMनाशिक : प्रतिनिधी

शहरात मनसेच्यावतीने पहाटे ५.३० वाजता शहर बस वाहतूक डेपो आडगाव नाका येथे शहर बस बंद करण्यात आली. पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, ठक्कर बस स्थानक येथील बस वाहतूक, दुकाने बंद करण्यात आली. 

नाशिक शहरातील विविध भागात मनसेच्यावतीने बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहे. बंद यशस्वी करण्यात येत आहे. मनसे प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुलभाऊ ढिकले यांच्या नेतृत्वाखाली मनसे नाशिक जिल्हा अध्यक्ष अनंत भाऊ सूर्यवंशी, मनसे पंचवटी विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे नाशिक शहर अध्यक्ष सौरभ सोनवणे, सागर बैरागी , परशूराम पाटील, सागर जाधव, हरिष गुप्ता, मनोज कोकरे, सुमीत शेलार, सुनील वाघ, राज ठाकरे, निलेश सहाणे, जितेंद्र जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.