पंचवटी : वार्ताहर
गंगाघाट परिसरात एका मद्यपी भिकार्याने दुसर्या भिकार्याच्या पायावर ब्लेडने वार केल्याने एका भिकार्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 1) घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने पंचवटी पोलिसांनी संशयित भिकार्याला अटक केली आहे.
शुक्रवार गंगाघाट रामकुंड येथे अनिल आपटे (60) आणि अरुण भामरे (56) दोन्ही भिकारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रामकुंडावर मद्याच्या नशेत एकमेकांशी बोलत असताना त्यांच्यात वाद झाला. यामधील अनिल आपटे याने आपल्याकडील ब्लेडने अरुण भामरे याच्या पायावर वार केले. जखमी भिकार्याला जिल्हा रुग्नालयात दाखल केले. मात्र, रक्तस्राव अधिक झाल्याने याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून संशयितास अटक केली.