Thu, Apr 25, 2019 21:36होमपेज › Nashik › राज्य नाट्य, बालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण जल्लोषात

राज्य नाट्य, बालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण जल्लोषात

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 08 2018 11:46PMनाशिक : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या  57 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व 15 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण बुधवारी (दि. 8) जल्लोषात पार पडले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ढोल-ताशांच्या गजरात कलावंतांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात रंगलेल्या ‘सबकुछ बागूभाई’ या विनोदी नाट्यप्रयोगाने उपस्थितांचे मनोरंजन केले. 

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, सिद्धार्थ अहिरे, शुभांगी पाठक, प्रा. बाळ नगरकर, माणिक कानडे, ईश्‍वर जगताप, विजय शिंगणे, प्रशांत हिरे, सुनील ढगे, राज फिरके, मीना वाघ यांच्या हस्ते नाशिक, अहमदनगर व जळगाव केंद्रातील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सचिन सुरेश यांनी निवेदन केले. या कार्यक्रमात ‘सबकुछ बागूभाई’ हा विनोदी नाट्यप्रयोग रंगला. संकल्पना व दिग्दर्शन लीना भागवत यांचे, तर लेखन सुमेधा देवस्थळी यांचे होते. अमिता खोपकर, बागेश्री जोशीराव, विनोद गायकर, सागर पेंढारी, गणेश जाधव, अमीर तडवळकर यांनी भूमिका केल्या. सुनील देवळेकर यांचे नेपथ्य, किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना, प्रकाश खोत यांचे पार्श्‍वसंगीत, तर विनोद कोरी यांचे नृत्यदिग्दर्शन होते. समन्वयकाची जबाबदारी मंगेश कदम यांनी सांभाळली.