Sun, Jul 21, 2019 16:32
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › बागलाणचे तहसीलदार सौंदाणे निलंबित

बागलाणचे तहसीलदार सौंदाणे निलंबित

Published On: Dec 21 2017 2:40PM | Last Updated: Dec 21 2017 2:40PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

बागलाणचे तहसीलदार सुनील सौंदाणे तालुकवासीयांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या बैठकांना गैरहजर राहण्यासह विकास कामांसाठी सहकार्य करीत नसल्याची तक्रार आमदार दीपिका चव्हाण यांनी केला होता. त्यामुळे दोघात सुरुवातीपासून संघर्ष सुरू होता. आमदार चव्हाण यांनी त्यांच्याविरोधात दीड वर्षांपूर्वी आमदारांच्या हक्कभंग समितीकडे तक्रार केली दाखल केली होती. दरम्यान आ. चव्हाण यांच्या तक्रारीमुळे धुळे येथे बदली झाल्यानंतर तहसीलदार सुनील सौंदणे याविरोधात मॅटमध्ये गेले होते. निकाल त्यांच्या बाजूने लागून ते पदावर रुजू झाले. मात्र गुरुवारी सभागृहात हक्कभंग समितीने सौंदाणे यांचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्याचा निर्णय जाहीर केला.

आ. चव्हाण यांनी यास आक्षेप घेत अधिकाऱ्यांवरील मेहरबानी तीव्र आक्षेप घेतला. विरोधी पक्षानेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार व अन्य आमदारांचे आमदार चव्हाणांना समर्थन लाभले. सभागृह दोन वेळा तहकूब करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सौंदाणे यांना निलंबित केल्याचे सभागृहात सांगितले.