Mon, Sep 24, 2018 19:56होमपेज › Nashik › डोक्‍यात दगड घालून तरूणावर जीवघेणा हल्‍ला 

डोक्‍यात दगड घालून तरूणावर जीवघेणा हल्‍ला 

Published On: Aug 04 2018 9:00PM | Last Updated: Aug 04 2018 9:00PMपंचवटी(जि. नाशिक) : वार्ताहर

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. भूषण पगारे असे जखमी तरूणाचे नाव असून, या हल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्नालयात उपचार सुरु आहेत.

गेल्‍या सहा महिन्यापूर्वी देखील या भूषणवर असाच हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून तो हल्ल्यातून बचावला होता. जखमी भूषणचा भाऊ एका सराईत गुन्हेगाराच्या हत्या प्रकरणात कारागृहात असून, त्याचाच बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा घटनास्‍थळी सुरू आहे. 

म्हसरूळ परिसरातील गणेशनगर  येथे भूषचे किराणा मलाचे दुकान आहे. तो शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञात संशयितांनी त्‍याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी भूषणच्या डोक्यात दगड घातल्‍याने त्याच्या डोक्यातून मोठा रक्तस्‍त्राव झाला आहे. तसेच त्याच्या हातावर देखील कोयत्याने वार करण्यात आल्‍याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख आणि गुन्हेशोध पथकाच्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली.