Fri, Nov 16, 2018 07:08होमपेज › Nashik › आशियाई स्पर्धा : दत्तू भोकनळ दुसऱ्या फेरीत दाखल 

आशियाई स्पर्धा : दत्तू भोकनळ दुसऱ्या फेरीत दाखल 

Published On: Aug 19 2018 7:25PM | Last Updated: Aug 19 2018 7:25PMचांदवड : वार्ताहर 

इंडोनेशिया येथील जकार्ता शहरात सुरु असलेल्या आशियाई गेम्स २०१८ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या चांदवडचा भूमिपुत्र दत्तू भोकनळने मेन्स सिंगल स्कल स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. त्याने पहिल्या फेरीत दोन किलोमीटरचे अंतर अवघ्या ८ मिनिटे ९ सेंकदात पूर्ण करीत व्दितीय क्रमांक पटकावला आहे. 

दत्तूने केलेल्या कामगिरीमुळे मेन्स सिंगल स्कल स्पर्धेच्या मंगळवार (दि.२१) रोजी होणाऱ्या दुसऱ्या फेरीसाठी तो पात्र झाला आहे. मेन्स सिंगल स्कल स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दत्तूने केलेल्या कामगिरीचे चांदवड तालुक्यातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. या स्पर्धेत दत्तूने देशासाठी सुवर्णपदक जिंकूनच परत यावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे.