Tue, Jun 25, 2019 14:06होमपेज › Nashik › नाशिकचे विमान अखेर १५ डिसेंबरला उढणार

नाशिकचे विमान अखेर १५ डिसेंबरला उढणार

Published On: Dec 01 2017 7:58PM | Last Updated: Dec 01 2017 7:58PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

राज्यातील महत्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याचा पहिला टप्पा निकाली निघाल्यानंतर आता नाशिक शहर दुसर्‍या टप्प्यात असून, उड्डाण योजनेअंतर्गत 15 डिसेंबरपासून हि विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानसेवेमुळे हैद्राबाद, बंगलोर, दिल्ली, गोवा, भोपाळ व अहमदाबाद या शहरांना नाशिक शहर जोडले जाणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक येथे विमानतळ साकारल्यानंतर गेल्या अडीच तीन वर्षांपासून नाशिक एअर कनेक्टिव्हीटीपासून दूरच राहिले आहे. हि विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. मात्र, शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

लहान शहरांमधील विमानतळे मोठ्या शहरांना जोडली जावेत यासाठी केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी उड्डाण योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत नाशिक शहराची विमानसेवा राज्यातील प्रमूख शहरांना जोडली जावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले होते. यावेळी मुंबई विमानतळावर टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले होते. या कारणामुळे कंपन्या हवाई सेवा सुरू करत नसल्याने संतप्त होत खासदार गोडसे यांनी दिल्लीत नागरी उड्डाण मंत्रालयासमोर आंदोलन करत संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. अखेर शासनाने मुंबई विमानतळावर टाईम स्लॉट उपलब्ध करून दिला असून, येत्या 15 डिसेंबरपासून विमान सेवा नाशिककरांच्या सेवेत दाखल होणार आहे.