Fri, Apr 26, 2019 17:59होमपेज › Nashik › अहिल्यादेवी पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याची  मोडतोड 

अहिल्यादेवी पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याची  मोडतोड 

Published On: Jun 08 2018 12:38AM | Last Updated: Jun 08 2018 12:38AMनांदगाव: प्रतिनिधी

शहरातील नियोजित राजमाता अहिल्यादेवी पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याची रात्री उशिरा अज्ञात समाजकटंकांनी मोडतोड केल्याने चबुतऱ्याचे कंपाउंड व मेन गेट तोडल्याचा प्रकार घडला. हे कळताच शहरात  काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चबुतऱ्याचे नुकसान झाल्याचे कळताच शहरातील विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या कार्यर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली.

नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी उपनगराध्यक्ष शिवाजी पाटील, नगरसेवक नितीन जाधव, कारभारी शिंदे, A°ड  सचिन साळवे, सचिन मराठे, बिरू शिंदे, गणेश शिंदे, हेमंत शिंदे, सागर नरोटे, सुनील सोर, विश्वास साठे, बिरुदेव देवकते, प्रवीण कन्नोर, शरद आयनोर आदींनी, पोलीस उपनिरीक्षक बी. यु. पदमणे यांची भेट त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यावर दोषी व्यक्तीवर कार्यवाही चे आश्वासन पदमणे यांनी दिल्याने वातावरणातील तणाव निवळला. सध्या शहरात विविध राष्ट्र पुरुषांचे पुतळ्यांना लोखंडी कंपाउंड टाकण्यात आलेले आहे. असेच कंपाउंड नियोजित अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी बांधण्यात आलेले आहे मात्र पुतळ्याची स्थापना होणे बाकी आहे. केवळ चबुतरा होता, त्यामुळे पुढील अनर्थ टाळला गेला असाल तरी पुतळ्यांच्या सुरक्षितेसाठी पोलीस व पालिका प्रशासनाला उपाय योजना करण्यासाठी आता पाऊले उचलावी लागणार आहेत 

 दरम्यान नागरिकांनी पो नि बशीर शेख यांची भेट घेउन परिस्थितीची माहिती दिली व चर्चा केली तसेच दोषीवर कारवाईची मागणी केली.