Sun, May 19, 2019 14:28
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मराठा क्रांती मोर्चातर्फे आज ठिय्या

मराठा क्रांती मोर्चातर्फे आज ठिय्या

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 08 2018 11:42PMनाशिक : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चातर्फे नाशिक शहरात  आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानावर ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकारी राधाकृष्णन. बी यांना निवेदन देण्यात येणार आहे.  ग्रामीण भागातदेखील तहसीलदार आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देऊन ठोक मोर्चात हुतात्मा झालेले शहीद समाजबांधवांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलनाची सांगता केली जाणार आहे. तसेच या दिवशी नाशिक शहर व जिल्हा बंद ठेवण्यात येणार नसल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. दि. 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत आरक्षणाचा ठराव करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार असून, शासनाने दिलेल्या वेळेत आरक्षणाचा तिढा सोडविला नाही तर पुढील काळात तीव्र स्वरूपात आक्रमक चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या आंदोलनाबाबत सोशल मीडियावरील अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले. 

बैठकीस सुनील बागूल, प्रकाश मते, चंद्रकांत बनकर, अर्जुन टिळे, अ‍ॅड. श्रीधर माने, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, हंसराज वडघुले, राजू देसले, चेतन शेलार, उमेश शिंदे, आशिष हिरे, शैलेश ढगे, शरद तुंगार, बंटी भागवत, तुषार गवळी, सचिन पवार, जितू चव्हाण, विलास जाधव, सचिन वाबळे, अमित पाटील, पूजा धुमाळ, अनुपमा पाटील, विकास कानमहाले, यश बच्छाव, संतोष माळोदे आदी समाजबांधव उपस्थित होते.