Mon, May 20, 2019 18:23होमपेज › Nashik › ललिताची ललितकुमार झालेल्या पोलिसाचा गावक-यांनी केले जंगी स्वागत 

ललिताची ललितकुमार झालेल्या पोलिसाचा गावक-यांनी केले जंगी स्वागत 

Published On: Jun 13 2018 6:36PM | Last Updated: Jun 13 2018 6:36PMमाजलगाव : प्रतिनिधी  

लिंगबदल शस्त्रक्रिया करुन ललीताची ललितकुमार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची शस्त्रक्रियेनंतर जन्मगावी राजेगाव येथे परतलेल्या ललितकुमार साळवेचे येथे गावक-यांनी वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

बीड पोलिस दलातील महिला पोलिस ललिता साळवे यांनी शरिरातील हार्मोन्सच्या बदलामुळे लिंगबदल शस्ञक्रिया करणे आवश्याक असल्याचे सांगितले होते. याबाबतची परवानगी शासनाकडे मागितली होती. मागिल महिन्यात राज्य शासनाच्या गृहविभागाने विशेष बाब म्हणून  लिंगबदल शस्ञक्रियेसाठी परवानगी दिली.

सरकारच्या परवानगीनंतर ललिता साळवेची पोलिस खात्यातील नौकरी पुरुष म्हणुन कायम राहणार आहे. मुंबई येथील सर सेन्ट जार्ज हॉस्पिटल मध्ये लिंगबदलची आठ डॉक्टरांच्या चमुने यशस्वी शस्ञक्रिया केल्यानंतर ललिताची आता ललितकुमार झाला आहे. आपल्या या वैयक्तिक हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या ललितकुमार साळवे त्याच्या जन्मगावी परतला. आपल्या माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथिल जन्मगावी येताच गावक-यांनी त्याचे जंगी स्वागत करत आंनद व्यक्त केला. यावेळी त्याचे आई वडीलांना भावना अनावर झाल्या.  

लिंगबदल केल्यानंतर खुप खुप आंनदी आसल्याची प्रतिक्रिया  ललितकुमार यांनी दिली आणि पाठीशी उभे राहणाऱ्यां सर्वांचे अभार मानले.