Fri, Apr 26, 2019 15:23होमपेज › Nashik › ’नृत्यासाठी गाणे, वेशभूषा निवड महत्त्वाची

’नृत्यासाठी गाणे, वेशभूषा निवड महत्त्वाची

Published On: Feb 28 2018 1:13AM | Last Updated: Feb 27 2018 11:20PMसिन्‍नर : प्रतिनिधी

स्पर्धकांनी एका कोपर्‍यात जाऊन नृत्य न करता संपूर्ण व्यासपीठाचा वापर केल्यास उत्कृष्ट नृत्य सादर करता येते. नृत्य सादरीकरणात गाण्याची निवड, वेशभूषा आणि गाण्यानुसार हावभाव अत्यंत महत्त्वाचे असतात. स्पर्धकांनी या बाबींवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला ‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम मीरा जोशी यांनी दिला.

लायन्स क्लब ऑफ सिन्‍नर सिटी व अशोका रिअ‍ॅल्टी यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित सिन्‍नर फेस्टिव्हलच्या नृत्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. लहान आणि मोठ्या कलाकारांची दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक फेरीतून दोन्ही गटांतून प्रत्येकी 10 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. अंतिम फेरी लायन्स सिन्‍नर फेस्टिव्हलच्या रंगमंचावर घेण्यात आली. लहान गटात श्रद्धा शेलार (प्रथम), हर्षल शेजवळ (द्वितीय) आणि साई वर्पे (तृतीय) यांनी, तर मोठ्या गटात वर्षा शिंदे (प्रथम), महेश मरसाळे, ऋतुजा खुस्तुले (द्वितीय), तर समृद्धी कुर्‍हे आणि अश्‍विनी कदम (तृतीय) बाजी मारली. विजेत्या स्पर्धकांना मीरा जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

परीक्षक म्हणून उदय देवनपल्ली आणि शशांक इरवणकर यांनी काम पाहिले. शिल्पा गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले. लायन्सचे अध्यक्ष डॉ. डी. एम. गडाख यांनी स्वागत केले. यावेळी हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, प्रा. टी. टी. खालकर, भूषण क्षत्रिय, रमेश जगताप, डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहारकर, शिवाजी माळवे, मनीष गुजराथी, हेमंत नाईक, संगीता कट्यारे, तेजश्री वाजे, डॉ. सुजाता लोहारकर, वैशाली सानप, अपर्णा क्षत्रिय, स्मिता थोरात, उज्ज्वला खालकर, शैला एखंडे, डॉ. प्रतिभा गारे, सरिता गाडे, श्यामल माळवे आदी उपस्थित होते.