होमपेज › Nashik › ट्रकच्या धडकेत दुचाकीस्‍वारीचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्‍वारीचा मृत्यू

Published On: Feb 05 2018 7:38PM | Last Updated: Feb 05 2018 7:37PMनाशिकरोड : वार्ताहर

येथील जेलरोड रस्त्यावर मुलीला शाळेत सोडून घरी परतणाऱ्या बेचाळीस वर्षीय व्यक्तीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण प्रकाश कुमट ( ४२ , रा.सुवर्णा सोसायटी ) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता अपघाताची घटना घडली. प्रविण हे मुलीला शाळेत सोडण्याकरिता गेले होते. मुलीला शाळेत सोडल्यानंतर कुमट गावाकडे जात होते. त्यावेळी बारा चाकी ट्रक (क्र.एमएच १५ इजी ८५०२) या क्रमांकाचा  ट्रक आणि  कुमट यांच्या दुचाकी (क्र.एचईएल ४३९०) या दोन्‍ही  वाहनांमध्ये अपघात झाला. कुमट यांच्या शरीरावरून ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान जेलरोड रस्त्यावर अवजड वाहनांना परवानगी नाही. मात्र सर्रासपणे अवजड वाहने रस्त्याने धावत असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे .