होमपेज › Nashik › वऱ्हाडी पिकअप पलटी; एक ठार, ६ जखमी 

वऱ्हाडी पिकअप पलटी; एक ठार, ६ जखमी 

Published On: Mar 06 2018 8:09PM | Last Updated: Mar 06 2018 8:09PMसिन्नर : प्रतिनिधी

वऱ्हाडी पिकअप रस्त्यालगत असलेल्या नाल्यात पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर, २५ जण  जखमी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सिन्नर-बारागाव पिंप्री रस्त्यावरील सुळेवाडी फाट्यावर हा अपघात झाला. संजय सखाराम माळी (वया, ४०, रा. बेघर वस्ती, निफाड) असे अपघातातत ठार झालेल्‍याचे नाव आहे. अपघातीतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.