Sat, Feb 23, 2019 02:00होमपेज › Nashik › नाशिक : ट्रॅक्टर-दुचाकी अपघात; एक ठार

नाशिक : ट्रॅक्टर-दुचाकी अपघात; एक ठार

Published On: Mar 04 2018 1:18PM | Last Updated: Mar 04 2018 1:17PMकळवण : प्रतिनिधी 

कळवण तालुक्यातील देसराने येथील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात एक ठार एक जखमी झाला. जखमींवर उपजिल्हा रुग्णलायत उपचार सुरू आहेत. कळवण पोलीस ठाणे येथे अज्ञात वाहन विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कळवण तालुक्यातील देसराने येथील रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरील पती आणि पत्नी मांडवाचा कार्यक्रम करून घरी येत होते. त्यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने अपघातात पतीचा जागीस ठार झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

दरम्यान देसराने गावातील ग्रामस्थांनी रस्ता रोको करून ट्रॅक्टर चालकाचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली. पोलिस निरीक्षक सुजय घाडगे यांची आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.