Fri, Jul 19, 2019 07:30होमपेज › Nashik › भावडबारीजवळ पुन्हा बसला अपघात

भावडबारीजवळ पुन्हा बसला अपघात

Published On: Sep 06 2018 4:51PM | Last Updated: Sep 06 2018 4:51PMमालेगाव (जि. नाशिक) : प्रतिनिधी

भावडबारी घाटाच्या पायथ्याशी बस आणि ट्रकमध्ये अपघात होऊन चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन दिवस होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा या मार्गावर बसला अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने गुरुवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात जीवितहानी झाली नाही. परंतु बस आणि पिकअपच्या चालक बाजू समोरासमोर धडकून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मंगळवारी (दि.४) विंचूर-प्रकाशा मार्गावर भावडे फाट्यावर भीषण अपघात झाला होता. तेथून साधारण पाच किमी अंतरावर देवळाकडे रामेश्वर फाट्यावर गुरुवारी अपघात झाला. नंदुरबार आगाराची मुंबई-नंदुरबार (एम एच २० बीएल ३१०८) व कॅरेट घेऊन चाललेला पिकअप (एम एच ४१ जी ९६८४) यांच्यात धडक झाली. चालक व प्रवाशांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे.